आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Usha Jadhav: “I Am Dazed By The National Award”

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'धग' या सिनेमासाठी अभिनयासाठी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री म्हणजे उषा जाधव. मधुर भंडारकरच्या 'ट्रॅफिक सिग्नल' या सिनेमातील छोट्याशा भूमिकेने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या उषाने करिअरच्या केवळ सहा वर्षांतच राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.


उषा म्हणते की, ''राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी निवड झालीय यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाहीये. 'धग' या सिनेमातील अभिनयाचे कौतूक होईल हे मला ठाऊक होते. मात्र श्रीदेवी, विद्या बालन, प्रियांका चोप्रा, मिताली जगताप या अभिनेत्रींच्या पंक्तीत मी येईल, असे मला मुळीच वाटले नव्हते. राष्ट्रीय पुरस्कारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत यावर्षी टफ कॉम्पिटीशन होती. त्यामुळे मी येथे टिकून राहिल, असे मला वाटले नव्हते.''


'धग' या सिनेमातील मुलाच्या उज्वल भविष्यासाठी झटणा-या आईची भूमिका कशी मिळाली, या प्रश्नावर उषा म्हणाली की, ''शिवाजी लोटन पाटील अभिनेत्रीच्या शोधात आहे, हे मला कळले. त्यानंतर मी त्यांना माझी काही छायाचित्रे आणि मी केलेल्या कामाचे व्हिडिओ पाठविले. पुढील दोन दिवसांतच माझी या भूमिकेसाठी निवड झाली. भूमिका डिग्लॅमराईज्ड असल्यामुळे मला लूकवर विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र भाषेवर मला जास्त लक्ष द्यावे लागले. राष्ट्रीय पुरस्कार ज्युरींनी माझ्या भूमिकेतील बारकावे बघून माझी निवड केली. मी ज्युरींची खूप खूप आभारी आहे.''


उषा पुढे म्हणाली की, ''मराठी कलाकारांसाठी 'धग'चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. हा सिनेमा बघून सई परांजपे यांनी शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर माझी तुलना केली. हा माझ्यासाठी एक सन्मानच होता. यापूर्वी मी या सिनेमात काही तरी उल्लेखनीय केले, असे मला वाटले नव्हते.''


उषा म्हणते की, ''मराठीबरोबरच मला इतर भाषेतील सिनेमेही करायचे आहे. सिनेमा हिंदी आहे की मराठी हे महत्त्वाचे नाही. भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे. भविष्यात मी चांगल्या कथानकाच्या शोधात आहे. बंगाली सिनेमात काम करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत.''