आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या उषा जाधवला तिकिट टू बॉलिवूड... ‘भूतनाथ 2’ च्या सिक्वेलमध्ये झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेत्री उषा जाधवला मिळाले आहे तिकिट टू बॉलिवूड. 'भूतनाथ' या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये उषा जाधव दिसणार आहे. ‘भूतनाथ-2’मध्ये जुही चावलाच्या जागी आता उषा दिसणार आहे. तिची भूमिका एका विधवा महिलेची आहे. या सिनेमामुळे ती खूप उत्साहित आहे.

ही पहिलीच संधी नाही, ज्यात उषा अमिताभ बच्चनसोबत काम करणार आहे. याआधीही ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका जाहिरातीत तिने त्यांच्यासोबत अभिनय केला आहे. शिवाय उषा मधुर भांडारकरच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये झळकली आहे. त्यानंतर ‘धग’ या मराठी सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. 'भूतनाथ 2'हा सिनेमा गेल्या वर्षी आलेला ‘चिल्लर पार्टी’चा सहदिग्दर्शक नीलेश तिवारी दिग्दर्शित करत आहे. रविवारपासून तिने चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.