आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री वाणी कपूर)
'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूर आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. या सिनेमात वाणीने ताराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी वाणीचे बरेच कौतुक झाले असून बॉलिवूडमध्ये ती लांबचा पल्ला गाठेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
वाणीने यशराज बॅनरच्या तीन फिल्म्स साईन केल्या आहेत. त्यापैकी तिचा 'शुद्ध देसी रोमान्स' हा पहिला सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. लवकरच वाणी यशराजच्या 'अशा कल्याणं' या तामिळ सिनेमात झळकणार आहे. 'अशा कल्याणं' हा सिनेमा 'बँड बाजा बारात' या बॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.
वाणीचा जन्म 23 ऑगस्ट 1992 रोजी दिल्लीत झाला होता. मुळची दिल्लीची असलेल्या वाणीचे वडील बिझनेसमन आहेत. तिने नवी दिल्लीतील माता जय कौर पब्लिक स्कूल अशोक विहारमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर इग्नू (IGNOU) मधून पदवी शिक्षण घेतले. वाणीची उंची 5.8 फिट (173cm ) आणि वजन 57 कि. ग्रॅम आहे.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी हॉटेलमध्ये करायची काम...
वाणीने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमावले. अनेक ब्रॅण्ड्ससाठी तिने जाहिराती केल्या आहेत. मॉडेलिंगमध्ये काम सुरु करण्यापूर्वी तिने टुरिज्ममध्ये शिक्षण पूर्ण करुन जयपूरच्या ओबेरॉय हॉटेल्समध्ये काम केले होते. त्यानंतर तिला आयटीसी या हॉटेलमध्येसुद्धा नोकरी मिळाली होती.

डेटिंगविषयी वाणी सांगते, की तिचा कुणी बॉयफ्रेंड नाहीये. मात्र याचा अर्थ तिला डेटिंग पसंत नाहीये, असा नाही. वाणीच्या मते, लग्नापूर्वी एखाद्या व्यक्तिची पारख करण्यासाठी डेटिंग चांगली कल्पना आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वाणीची निवडक छायाचित्रे...