आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaani Kapoor, Elli Avram, Shamita Shetty, Shruti Hasan Stuns As LFW

LFW 2014: बॉलिवूड सौंदर्यवतींसह युवीही अवतरला रॅम्पवर, पाहा इव्हेंटची खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून वाणी कपूर, युवराज सिंह आणि शमित शेट्टी)
मुंबई: लॅक्मे फॅशन वीक विंटर/फेस्टीव्हल 2014च्या पाचव्या दिवशी बी-टाऊनच्या अनेक अभिनेत्रींनी रॅम्पवॉक केला. बी-टाऊनसह काही खेळाडूंनीही याला उत्सफूर्त प्रतिसाद दिला. यांच्यासह हा इव्हेंट पाहण्यासाठी काही स्टार्सनी हजेरी लावली होती.
पाचव्या दिवशी रॅम्पवर अभिनेत्री नर्गिस फाखरी, वाणी कपूर, श्रुती हसन, एली अवराम, नेहा धूपिया, शमिता शेट्टी, पत्रलेखासह अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी रॅम्पवॉक केला. यावेळी श्रुती हसन, नर्गिस, वाणी ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसल्या. शमिता, पत्रलेखा, एली अवराम ह्या वेस्टन कल्चरमध्ये दिसून आल्या. या सर्वांसह विवेक ओबेरॉय पत्नी प्रियांका चोप्रासह या इव्हेंटमध्ये पोहोचला होता. बोमन इराणी, कमाल सदाना, मुकुल देव, जॅकू भगनानी, शरमन जोशीसुध्दा इव्हेंटमध्ये सामील झाला होता.
क्रिकेटर युवराज सिंहनेसुध्दा रॅम्पवॉक केला. तो वाइक सूटमध्ये दिसला. त्याच्या हातात हेल्मेट दिसून आले. जहीर खानदेखील या फॅशन वीकमध्ये दिसला. मंगळवारी (19 ऑगस्ट) सुरु झालेल्या या इव्हेंटचा आज (24 ऑगस्ट) शेवटचा दिवस होता. या फॅशन वीकचे कॉस्मेटिक ब्रँड लॅक्मे आणि IMG Relianceने आयोजन केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...