आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vaibhav Tatwawadi & Prarthana Behere In Upcoming Movie Cofee Ani Baracha Kahi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैभव आणि प्रार्थनाची रोमँटिक कॉमेडी ‘कॉफी आणि बरंच काही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे खूप महत्व आहे. ही नाती आयुष्यामध्ये जपण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे असते. आधीच्या पिढ्यांमधील नात्यांमध्ये असलेला मायेचा ओलावा, आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. फेसबुक ट्विटर चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधान्याकडे सध्याच्या पिढीचा कल असतो. तरीही आजची जनरेशन नात्यांबद्दल फारच खोलात जाऊन विचार करते. अशाच युवा पिढीच्या जगण्यावर भाष्य करणारा आणि निखळ मनोरंजनाचा आस्वाद देणारा 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा रुपेरी पडद्यावर आकारास येत आहे.

‘मोशन स्केप एण्टरटेनमेण्ट’ या संस्थेची निर्मिती असलेला आगामी 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमातून युवा वर्गाच्या जगण्यामधील गोडवा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

प्रकाश कुंटे आणि राहुल ओदक यांच्या ‘मोशन स्केप एण्टरटेनमेण्ट’ ची निर्मिती व राजेंद्र शिंदे यांच्या सुप्रीम मोशन आणि संदिप केवलन यांच्या एस.के.प्रॉडक्शन या संस्थांची सहनिर्मिती असलेल्या ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः प्रकाश कुंटे करत आहेत. नात्यांमधील सुसंवादातून घडणारी रोमँटिक कॉमेडी ड्रामा सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सिनेमाविषयी बरंच काही...