Home »Marathi Katta» VALENTINE Day Mita Sawarkar Intervew

VALENTINES SPL : कामाचा आदर करणारा नवरा हवा

वैशाली करोले | Feb 14, 2013, 10:12 AM IST

  • VALENTINES SPL : कामाचा आदर करणारा नवरा हवा

आपल्या व्हॅलेंटाइनसाठी हा दिवस स्पेशल करण्याचा सगळेच प्रयत्न करत असतात. काही जणांकडे त्यांचा व्हॅलेंटाइन आहे तर काही अद्यापही त्याच्या शोधात आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या मीता सावरकरलासुद्धा अद्याप तिचा व्हॅलेंटाइन गवसलेला नाहीये. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आम्ही मीताकडून तिचा व्हॅलेंटाइन अर्थातच मिस्टर परफेक्ट कसा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मीताच्या व्हॅलेंटाइन अर्थातच मिस्टर परफेक्टबद्दल जाणून घेऊया तिच्याचकडून...

''हाय फ्रेंड्स... मी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. अनेक जाहिरातींमध्ये तुम्ही मला बघितले आहे. अलीकडेच माझे 'पांगिरा' आणि 'भारतीय' हे दोन सिनेमेसुद्धा रिलीज झाले आहेत. सतत कामाकडे लक्ष देताना स्वतःच्या मिस्टर परफेक्ट बद्दल विचार करायला कधी वेळच मिळाला नाही. मात्र या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपला मिस्टर परफेक्ट कसा असावा, हा विचार माझ्या मनात डोकावला आहे. खरे सांगायचे तर माझा मिस्टर परफेक्ट कसा असेल हे मला ठाऊक नाही. तो जेव्हा माझ्यासमोर येईल तेव्हा मला क्लिक होईल की, याच्याच शोधात मी होते.

कोणत्याही सर्वसामान्य मुलीची अपेक्षा असते, तसा हॅण्डसम गुडलुकींग नवरा मलासुद्धा हवाय. माझ्या त्याच्याकडून खूप अपेक्षा नाहीये. हं पण त्याच्या क्वालिटीजबद्दल बोलायचे झाले तर मी जशी आहे, तसा त्याने माझा स्वीकार करायला हवा. मी करिअरिस्टिक मुलगी आहे. मला काम करायला आवडतं, त्यामुळे नक्कीच त्याने माझ्या कामाचा आदर ठेवायला हवा. माझ्या गुणावगुणांबरोबर त्याने माझा स्वीकार करायला हवा. नवरा-बायकोने एकमेकांना स्पेस द्यायला हवी, या विचारांचा तो असावा. मी लव्ह मॅरेज करेल की अरेंज हेसुद्धा मला माहित नाही. अद्याप माझा हा शोध पूर्ण व्हायचा आहे. हं पण जसा माझा शोध पूर्ण होईल तसे मी तुम्हाला नक्कीच कळवेल.

सो फ्रेंड्स हा व्हॅलेंटाइन मस्त एन्जॉय करा आणि आपल्या जोडीदारावर भरभरुन प्रेम करा. हॅपी व्हॅलेंटाइन डे, एन्जॉय.''

Next Article

Recommended