आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त 'धुंदीत मी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅलेंटाइन्स डेचे निमित्त साधत 'धुंदीत मी' हा प्रेमगीतांचा नवा अल्बम प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या अल्बमचे खास वैशिष्ट्य म्हणजे नऊ गाणी, नऊ गीतकार आणि नऊ संगीतकार यांच्या साथीने हा अल्बम तयार करण्यात आला आहे.

सोनाली जोशी, हेमंत बर्वे, प्रसाद कुलकर्णी, मंदार चोळकर, मधुकर आरखडे, चंद्रशेखर सानेकर, राजेश बामगुडे, अरुण म्हात्रे, अनुराधा नेरुलकर हे या अल्बमचे गीतकार आहेत. तर अभिजीत राणे, विक्रांत वार्डे, भगवंत नार्वेकर, निलेश मोहरीर, सचिन मालप, सुधांशू, मयुरेश माडगावकर, किशोर मोहिते, अशोक वायंगणकर या नऊ संगीतकारांनी अल्बममधील गाणी संगीतबद्ध केली आहेत. ही गाणी मंगेश चव्हाण यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

प्रेमाच्या विविध छटा या अल्बममध्ये ऐकायला मिळतील. या ऑडीओ अल्बमबरोबर व्हिडिओ अल्बमसुद्धा रिलीज करण्यात आला आहे. 'धुंदीत मी' हा अल्बम प्रेमीयुगलांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की.