आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VALENTINE SPL: \'प्रिया सोबत असते, तोच माझ्यासाठी खरा व्हॅलेंटाइन डे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्व तरुणाईला वेध लागले आहेत ते व्हॅलेंटाइन डेचे. हा दिवस म्हणेज आपल्या आवडत्या व्यक्तिवर आपले असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. हा दिवस आपले सेलिब्रिटी कसा साजरा करतात हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आज अभिनेता उमेश कामत त्याच्या या खास दिवसाबद्दल आपल्या चाहत्यांना सांगत आहे.
''गेल्या आठ-दहा दिवसांपासून माझी आणि प्रियाची भेट झालेली नाहीये. कारण मी आणि प्रिया दोघेही कामात खूप बिझी आहोत. सध्या माझे 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेचे शुटिंग आणि 'पुणे व्हाया बिहार'चे प्रमोशन सुरु आहे. प्रियासुद्धा शुटिंगच्या निमित्ताने पुण्याला आहे. कामाच्या व्यापात आमची फारशी भेट होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी प्रिया आणि मी सोबत असतो, तोच दिवस आमच्यासाठी व्हॅलेंटाइन डे असतो. मी तर म्हणेल एकच दिवस प्रेमाचा दिवस म्हणून का साजरा करावा. माझ्यासाठी वर्षाचे 365 दिवस हे व्हॅलेंटाइन डे आहेत.
आता व्हॅलेंटाइनचा विषय निघालाच आहे तर यंदाचा आमचा व्हॅलेंटाइन डे रंगमंचावर साजरा होणार आहे. कारण यादिवशी ठाण्यात आमच्या 'नवा गडी नवा राज्य' या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. ब-याच दिवसांनी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आम्ही एकत्र वेळ एन्जॉय करणार आहोत. याव्यतिरिक्त या दिवसासाठी वेगळे प्लानिंग केलेले नाही.
प्रिया आणि माझी लव्ह स्टोरी खूप इंट्रस्टिंग आहे. मैत्रीतून आमच्यात प्रेम फुलले. सहा वर्षांच्या मैत्रीनंतर आम्ही लग्न केले. खरं तर आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम होतं. मात्र विचारायची हिंमत होत नव्हती. रोज आमचं फोनवर बोलणं व्हायचं. पण कधी विचारायची हिंमत झाली नाही. मात्र 9 ऑगस्टला प्रियाने न राहावून मला विचारले. त्यावेळी होकार द्यावा, असं मनात आलं होतं. मात्र मी हा विषय जरा ताणून धरायचं ठरवलं. 18 सप्टेंबरला प्रियाचा वाढदिवस असतो. त्यादिवशी तिला 'हो' म्हणायचं मी ठरवलं. सहा वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. कारण मध्यंतरीच्या काळात आम्हाला दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. करिअरची घडी नीट बसल्यानंतर आम्ही लग्न केले आणि आता आमचा राजा-राणीचा संसार सुरु आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा मराठी फिल्म इंडस्ट्रीतील क्यूट कपल असलेल्या प्रिया-उमेशचे खास रोमँटिक क्षण...