प्रशांत दामले मराठी नाट्यक्षेत्रातील एक चमकता तारा, नाट्यक्षेत्रातील देदीप्यमान कारकीर्द. गेला माधव कुणीकडेचे विक्रमी प्रयोग, चार-चार लिम्का रेकॉर्ड, 29 वर्षांच्या कारकीर्दीत 26 नाटकांचे 10 हजार 701 प्रयोग, 37 चित्रपट, 24 मालिका, डझनभर जाहिरातीसह रिअँलिटी शोचे सूत्रसंचालन.एका सामान्य कलाकाराचा असामान्य अभिनय प्रवास. विविध भूमिका साकारणार्या 'बहुरूपी' प्रशांतच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती पत्नी गौरीने. म्हणून गौरी या त्यांच्या संसाराचा कणा ठरतात.
मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि आम्ही दोघे राजाराणी, वाजवा रे वाजवा, बंडलबाज, पसंत आहे मुलगी, सगळीकडे बोंबाबोब यामधील एक साम्य म्हणजे प्रशांत दामले. नाटक, चित्रपट आणि टीव्ही अशा तिन्ही माध्यमांत प्रशांतने स्वत:चा ठसा उमठवला. यशाच्या शिखरावर असतानादेखील त्याचे पाय जमिनीवर आहेत. to make people laugh all the time, i want to see hapiness on there face असे मानणार्या या कलाकाराच्या आयुष्यात आनंद भरण्याचे काम गौरीने केले.
आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला प्रशांत आणि गौरी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत. लग्नाला 28 वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्यातील प्रेमांकुर दिवसेंदिवस फुलत चालला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कशी झाली होती गौरी आणि प्रशांत यांची पहिली भेट आणि यांसह बरंच काही...