चित्रपटसृष्टीतील काही जोड्या या पडद्याप्रमाणे खर्या आयुष्यातदेखील हिट ठरल्या. दिलीपकुमार-सायरा बानू, अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत आणखी एक जोडी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे रमेश -सीमा देव...
लोकलच्या प्रवासात दरवळलेला मोगर्याचा सुंगध तसाच त्यांच्या आयुष्यात कायम राहिला. चंदेरी दुनियेत काम करताना तसेच कौटुंबिक जबाबदार्या जपताना देखील या जोडीचा लौकीक मोगर्याच्या सुंगधाप्रमाणे सर्वत्र दरवळत राहिला आहे. अनेक प्रसंगात एकमेकांना साथ देणारे ‘देव’ दाम्पत्य खर्या अर्थाने कणा आहेत.
आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी...