प्रत्येक पुरुषाच्या यशात एका स्त्रिचा वाटा असतो, असे म्हणतात. नव्या पिढीचे संगीतकार तसेच बालगीताचे संगीतकार अशी ज्यांची ओळख आहे ते डॉ. सलील कुलकुर्णी. यांनी संगीताच्या क्षेत्रात चढउतार पाहिले आहेत. पण या चढउतारात त्यांना साथ होती, ती त्यांच्या पत्नी गायिका अंजली कुलकर्णी यांची. यामुळे डॉ. सलील यांच्या यशात त्यांच्या पत्नी अजंली यांचा मोलाचा वाटा ठरतो.
सलील यांच्या प्रत्येक निर्णयात अजंली यांचे पाठबळ होते. मग ते लग्न झाल्या, झाल्या सलील यांच्या डॉक्टरकी सोडण्याचा निर्णय असो. करिअरच्या सुरूवातीच्या काळात संगीताचे कार्यक्रम करताना मिळणा-या कमी पैशात काटकसरीने घर चालवण्याची कसरत असो किंवा आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे सुरवातीच्या काळात स्वत: सभागृहाबाहेर बसून टिकीट विकण्याचा उपक्रम असो. डॉ. सलील यांना प्रत्येक गोष्टीत अंजली यांची मिळालेली अनमोल साथच डॉ. सलील यांना संगीत क्षेत्रात प्रसिद्धी वलय निर्माण करतांना शक्ती देणारी ठरली.
चला तर मग व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जाणून घेऊन सलील आणि अंजली यांच्यातील स्ट्राँग बाँडिंगविषयी..