आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentines Day: Love Story Of Madhubala And Dilip Kumar

एकमेकांत आकंठ बुडाले होते, पण दिलीप यांच्या एका अटीने हिरावून घेतले होते मधुबालाचे प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबाला बॉलिवूडची लावण्य सौदर्यवती. तिच्या सौंदर्यावर अनेक पुरुष फिदा होते. आपल्या निरागस चेह-याने ती कुणालाही आकर्षित करत होती. मात्र, तिचे केवळ एकाच व्यक्तीसाठी जगत होती. इतरांसाठी दिलीप कुमार केवळ तिच्यासाठी यूसुफ होते. यूसुफ यांच्यासाठीच तिचे हृदय धडधडायचे. परंतु यूसुफ दूर झाल्यानंतर तिने काही वर्षांतच जगाला 'अलविदा' म्हटले. गतकाळातील सुंदर अभिनेत्री मधुबालाची यांचे प्रेमप्रकरण आजही चर्चेचा विषय आहे. मात्र दिलीप आणि मधुबाला कधीच एक होऊ शकले नाही. एका वळणावर दोघांचे नाते तुटले, त्यामागे दिपाली कुमार यांची एक अट होती. दिलीप यांनी मधुबाला सिनेमाच्या सेटवर थोबाडीत मारली होती. त्यानंतर दोघांचे नाते कसे तुटले. चला जाणून घेऊया मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्यारवाली लव्हस्टोरी...
मधुबाला आणि दिलीप कुमार 'तराना' सिनेमाचे शूटिंग करत होते. पहिल्यांदा दोघे एका सिनेमात एकत्र काम करत होते. मधुबाला दिलीप कुमार यांना पसंत करत होती, परंतु कधीच प्रेम व्यक्त करण्यास तिली भिती वाटत होती. दिलीप साहेब तिच्या प्रेमाला नाकारतील अशी तिच्या मनात भिती होती. परंतु एक दिवस मधुबालाने हिम्मत करून दिलीप यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रासोबत लाल गुलाबसुध्दा पाठवले होते. पत्रात मधुबालाने लिहिले, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि जर तुम्हीही करत असाल तर हे गुलाब स्वीकार करा अथवा पुन्हा परत पाठवा.'
दिलीप यांनी मधुबाला यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि ते गुलाब आपल्याकडे ठेवले.
गतकाळातील प्रसिध्द पत्रकार गुलशन इव्हिंगने एका मासिकात लिहिले होते, की मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्यांच्यासमोर कुणी दिलीप कुमार यांचे नावदेखील घेतले तर त्या लाजत होत्या.
मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. मात्र मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नाते पसंत नव्हते. मधुबाला कोणच्याही प्रेमात पडू नये असे त्यांना वाटत होते. त्यांनी दिलीप कुमार यांना रिजेक्ट केले होते. त्यावेळी 'नया दौर' सिनेमात दिलीप यांच्यासोबत मधुबालादेखील होती. शूटिंगसाठी मुंबईमधून बाहेर जायचे होते, परंतु मधुबालाच्या वडिलांनी तिला परानगी दिली नाही. तेव्हा दिग्दर्शकाने सिनेमात मधुबालाला काढून वैजयंतीमालाला घेतले. रागावलेल्या मधुबालाच्या वडिलांनी दिग्दर्शकावर तक्रार दाखल केली होती. त्यावेळी दिलीप यांनी मधुबालाविषयी अभद्रभाषादेखील वापरली होती. दिलीप कुमार यांच्या बोलण्याचा मधुबाला राग आला होता. मधुबालाने दिलीप यांना आपल्या वडिलांची माफी मागण्यास सांगितली होती. मात्र दिलीप कुमार यांनी असे करण्यास नकार दिला होता. दिलीप कुमार यांनी मधुबाला समोर एक अट ठेवली होती, की तिला वडील किंवा दिलीप कुमार दोघांमधून एकाला निवडावे लागेल. त्यावेळी मधुबालाने वडीलांना निवडले आणि दिलीप मधुबालापासून कायमचे दूर झाले.
मधुबाला यांना शूटिंगशिवाय इतर कार्यक्रम किंवा पार्ट्यामध्ये जाण्यास त्यांचा वडिलांची परवानगी घ्यावी लागत होती. शूटिंग सेटवरसुध्दा त्या कुणाला भेटू शकत नव्हत्या. हे मधुबाला यांचे प्रेम म्हणा अथवा वडिलांचा आदर. मधुलाबा यांचे वडील दोघांच्या प्रेमाविरोधात होते, तरीदेखील दोघे एकमेकांना भेटण्यासाठी काहीतरी बहाणा काढत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा मधुलाबा आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी...
नोट: 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो. तसेच गतकाळातील अभिनेत्री मधुलाबा यांचा आज वाढदिवससुध्दा आहे. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकथेविषयी सांगत आहे...