आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan And Alia Bhatt Promote 'Humpty Sharma Ki Dulhaniya'

वरुण-आलियाने काहीशा अशा अंदाजात केले सिनेमाचे प्रमोशन, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर सिटी मॉलमध्ये प्रमोशनदरम्यान आलिया भट्ट आणि वरुण धवन
मुंबई: वरुण धवन आणि आलिया भट्ट अभिनीत 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' 11 जुलै रोजी रिलीज होणार आहे. दोन्ही स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये असे दिसून येत आहे. काल (5 जुलै) वरुण आणि आलिया सिनेमा प्रमोट करण्यासाठी घाटकोपर वेस्ट, मुंबईमधील सिटी मॉलमध्ये पोहोचले होते.
येथे त्यांनी केवळ सिनेमाचे प्रमोशनच नव्हे तर चाहत्यांसह बरीच धमाल केली. यादरम्यान वरुणने डान्स परफॉर्मन्स देऊन उपस्थित लोकांचे मनोरंजन केले. याव्यतिरिक्त गुडघ्यावर बसून हम्प्टीने दुल्हनियासमोर आपले प्रेम व्यक्त केले. हा सीन पाहून मॉल टाळ्या आणि शिट्यांनी दणादणून गेला होता.
सिनेमामध्ये आशुतोष राणासुध्दा मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'बालिका वधू' फेम शिव अर्थातच सिध्दार्थ शुक्लासुध्दा या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या या प्रमोशनल इव्हेंटची छायाचित्रे...