(वरुण धवन आणि श्रध्दा कपूर)
मुंबई- बॉलिवूडचे यंगस्टार्स वरुण धवन आणि श्रध्दा कपूर गुरुवारी (6 नोव्हेंबर) मुंबईमधील अंधेरी परिसरात दिसले. दोघे
आपल्या 'ABCD 2'च्या शूटिंगसाठी येथे पोहोचले होते असे कळते.
यावेळी वरुण पिंक टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला,. वरुणने उजव्या हातावर मायकल जॅक्सनचा टॅटू बनवलेला होता. तसेच, श्रध्दा कपूर ग्रीन टॉप, मल्टी कलरच्या लेग्जिंस आणि शॉर्ट डेनिममध्ये दिसली. तिने ब्लॅक लेदर बूट घातलेले होते. रेमो डिसूजासुध्दा त्यांच्यासोबत दिसला. 'ABCD 2' डान्सवर आधारित सिनेमा आहे. त्यासाठी वरुण आणि श्रध्दा यांनी खूप मेहनत घेतली आहे. दोघे डान्सच्या सरावासाठी रेमोच्या स्टुडिओमध्ये जात होते.
'ABCD 2'चे दिग्दर्शन रेमो डिसूजा करत आहे. सिनेमात प्रभूदेवा, लॉरेन आणि प्रतीक पाठकसुध्दा आहेत. सिनेमा सिध्दार्थ रॉय कपूर निर्मित करत आहे. 26 जून रोजी सिनेमा रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'ABCD 2'च्या शूटिंगदरम्यानची वरुण-श्रध्दाची छायाचित्रे...