आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'ABCD-2\' च्या प्रमोशनसाठी वरुणने उडवली शॅम्पेन, श्रद्धाने केला डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशनमध्ये श्रद्धा कपूर आणि वरुण धवन)
मुंबईः वरुण धवन आणि श्रद्धा कपूर सध्या आपल्या आगामी 'एबीसीडी 2' या डान्स बेस्ड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच निमित्ताने हे दोघे शुक्रवारी मुंबईत आयोजित 'ऑल इंडिया डान्स कॉम्पिटीशन 2015' मध्ये सहभागी झाले होते. दोघेही येथे मजामस्तीच्या मूडमध्ये दिसले. एकीकडे श्रद्धाने आपल्या सिंगिंग आणि डान्सिंगने उपस्थितांची मनं जिंकली. तर दुसरीकडे वरुणने केक कापताना आणि शॅम्पेन उडवताना दिसला.
वरुणने स्टेजवर तालही धरला. दोघेही या कार्यक्रमात कॅज्युअल लूकमध्ये दिसले. श्रद्धा ब्लॅक अँड व्हाइट टी-शर्टसोबत डेनिम घातले होते. तर वरुण ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसला.
24 एप्रिल रोजी वरुणने वयाची 28 वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने 'एबीसीडी 2'च्या टीमसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिग्दर्शक रेमो डिसुजा उपस्थित होते.
'एबीसीडी 2' या सिनेमात वरुण आणि श्रद्धाने डान्सरची भूमिका साकारली आहे. सिनेमात प्रभूदेवा आणि लॉरेन गॉटलिब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रेमो डिसुजा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 19 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढे पाहा, प्रमोशनवेळी क्लिक झालेली वरुण धवन आणि श्रद्धा कपूरची खास छायाचित्रे...