आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan To Play A Prominent Role In The Sequel Of Akshay Kumar’S Baby

अक्षयच्या 'बेबी'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब, वरुण धवन झळकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन आणि अक्षय कुमार)
'बेबी'ला मिळालेल्या मर्यादित यशावर समाधान व्यक्त करत अक्षय कुमारने आगामी चित्रपटावर काम सुरू केले आहे. 'बेबी' चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्येच या चित्रपटाचा सिक्वेल बनण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 26 जानेवारी 2017 रोजी 'बेबी' चा सीक्वेल प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे देखील समजते. 23 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या बेबीने बॉक्स ऑफिसवर 89 कोटींचा गल्ला जमवला आहे.
निर्माता भूषण कुमारनी सांगितले की, आम्ही सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक नीरज पांडे याची शूटिंग 2016 पासून सुरू करणार आहेत. तत्पूर्वी ते 'एमएस धोनी' बनवणार आहेत. जो किक्रेटपटू महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक आहे. या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे.
2016 मध्ये शूटिंगला सुरुवात होणाऱ्या 'बेबी-2'ची रिलीज डेट 26 जानेवारी 2017 ही निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सिक्वलेच्या शूटिंगमध्ये बदल झाल्यास रिलीज डेटमध्येदेखील बदल होऊ शकतो. यादरम्यानच्या काळात अक्षय 20 फेब्रुवारीपासून राजा मेनन यांच्या दिग्दर्शनामधील 'एअरलिफ्ट'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिक्वेलमध्ये वरुण धवन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्याने आपला होकार कळवला आहे.
'बेबी'मध्ये भारतामधील एक गुप्तहेर संस्था जी 'बेबी' नावाने ओळखली जाते ती दहशतवाद रोखण्याचे काम करते. त्यांच्या एका मोहिमेत काही अतिरेक्यांच्या मुसक्या बांधल्याचेही चित्रपटात दाखवण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती.
मूळ चित्रपटावरून अंदाज बांधला तर 'बेबी 2'मध्ये गुप्तहेर संस्थेच्या नावात बदल होऊ शकतो. सिक्लेवमध्ये अक्षय कुमार आणि वरुण धवनसोबत अनुपम खेर, तापसी पन्नू, मधुरिमा तुली, राणा दग्गुबत्ती यांच्यादेखील भूमिकांचा समावेश आहे.