(डावीकडून - वरुण धवन, अभिनेत्री किरण जुनेजा आणि अभिनेता जॉनी लिव्हर)
मुंबई -
अक्षय कुमार स्टारर 'एन्टरटेन्मेंट' हा सिनेमा उद्या सिल्व्हर स्क्रिनवर रिलीज होतोय. रिलीजपूर्वी अक्षयने बुधवारी रात्री मुंबईत आपल्या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यामध्ये बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. सनी सुपर साऊंड या ठिकाणी हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
स्क्रिनिंगमध्ये बॉलिवूडचा यंगस्टार वरुण धवन सहभागी झाला होता. यावेळी तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. वरुणसह अभिनेता तुषार कपूर, दिग्दर्शक डेविड धवन, दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेत्री किरण जुनेजासह इतर सेलेब्ससुद्धा दिसले. कॉमेडियन जॉनी लिव्हर पत्नी सुजातासह पोहोचले होते.
साजिद-फरहाद दिग्दर्शित हा कॉमेडी सिनेमा असून यामध्ये तमन्ना भाटीया, मिथून चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, जॉनी लिव्हर, प्रकाश राज, सोनू सूद झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एन्टरटेन्मेंट'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...