आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: इव्हेंटमध्ये यामीचा दिसला ग्लॅमरस लूक, वरुणने नवाजला उचलून घेतले कडेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः नवाजुद्दीन सिद्दिकी, वरुण धवन आणि यामी गौतम)
मुंबईः अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या आगामी 'बदलापूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रविवारी प्रमोशनच्या निमित्ताने वरुण मुंबईतील फिनोलेक्स मॉलमध्ये पोहोचला होता. यावेळी यामी गौतम आणि नवाजुद्दीन सिद्दिकी वरुणसोबत हजर होते.
इव्हेंटमध्ये यामी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने व्हाइट टॉप, व्हाइट ब्लेजर आणि ब्लू शॉर्ट परिधान केले होते. यामीने हाय हिल्सचे सँडल आणि पिंक लिपस्टिकने आपला लूक पूर्ण केला. दुसरीकडे वरुण आणि नवाजुद्दीन कॅज्युअल लूकमध्ये दिसले. सर्वांनी येथे भरपूर धमालमस्ती केली. या धमालमस्तीत वरुणने नवाजुद्दीनला कडेवर उचलून घेतले. येथे तिघांनीही हेमर गेम खेळला.
वरुण स्टारर 'बदलापूर' हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दिनेश विजन आणि सुनील लुल्ला याचे निर्माते आहेत. हुमा कुरैशी, विनय पाठक आणि दिव्या दत्ता यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रमोशनवेळी क्लिक झालेली वरुण, यामी आणि नवाजुद्दीन यांची छायाचित्रे...