आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Varun Dhawan's Upcoimg Film Badlapur Only For Adult, Got A Certificate From Censor Board

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुले बघू शकणार नाहीत वरुण धवनचा 'बदलापूर', या दृश्यांमुळे मिळाले 'ए' सर्टिफिकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बदलापूर या सिनेमातील एका दृश्यात वरुण धवन आणि यामी गौतम)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आगामी 'बदलापूर' हा सिनेमा लहान मुले नव्हे तर केवळ वयस्क बघू शकणार आहे. याचे कारण म्हणजे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट दिले आहे. निर्माते दिनेश विजन आणि सुनील लुल्ला यांनी सिनेमातील सेक्स आणि हिंसेचे सीन्स वगळण्यास नकार दिल्याने सेन्सॉर बोर्डाने हा निर्णय घेतला.
मंगळवारी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसाठी या सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या सिनेमातील वरुण धवन-यामी गौतम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला सेक्स सीन आणि सिनेमात प्रॉस्टिट्युटची भूमिका साकारणा-या हुमा कुरैशी आणि वरुण यांच्या स्मूच सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आणि हे दोन्ही सीन्स निर्मात्यांना सिनेमातून काढून टाकण्यासाठी सांगितले.
इतकेच नाही तर सिनेमातील एका दृश्यात वरुण एका व्यक्तीला हाथोड्याने मारुन त्याची हत्या करतो. हे दृश्यही सेन्सॉरने सिनेमातून वगळण्यास सांगितले. मात्र श्रीराम राघवन यांनी कोणताही सीन वगळण्यास नकार दिला. त्यामुळे सिनेमाला 'U/A' ऐवजी 'A' सर्टिफिकेट देण्यात आले आहे. आता अठरा वर्षांवरील लोकच हा सिनेमा बघू शकतील.
'बदलापूर' हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. वरुण धवन, यामी गौतम आणि हुमा कुरैशी यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी, दिव्या दत्ता, राधिका आपटे, विनय आपटे या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यामी आणि गौतम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या इंटीमेट सीनची झलक...