अभिनेता वरुण कॉलेज तरुणींना उचलताना...
मुंबई - अभिनेता वरुण धवनचे मागील दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता त्याचा 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' हा तिसरा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये वरुण आणि त्याची को-स्टार आलिया भट्ट जीवतोड मेहनत घेत आहेत. मात्र अलीकडेच वरुण एकटा आपल्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसला.
यानिमित्ताने अलीकडेच तो मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये पोहोचला होता. मुंबईत पाऊस सुरु असताना वरुण सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. वरुणला पाहून कॉलेजमधील तरुण मंडळी खूप उत्साहीत झाली होती. येथे वरुणने कॉलेज तरुणींना उचलून डान्स केला. वरुणची एक झलक बघण्यासाठी कॉलेजमध्ये खूप गर्दी जमा झाली होती. यावेळी वरुण कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने यावेळी सिनेमाच्या सीडी आणि टी-शर्टचे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले.
यापूर्वी वरुण आणि आलिया मुंबईतील एचआर कॉलेजमध्येही प्रमोशनसाठी गेले होते. 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा पुढील आठवड्यात म्हणजे 11 जुलै रोजी रिलीज होणार आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता तर शशांक खेताना दिग्दर्शक आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मीठीबाई कॉलेजमध्ये पोहोचलेल्या वरुणने विद्यार्थ्यांसह कशी केली मस्ती...