आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun, Tiger, Abhishek, Celebs At 21st Lions Gold Awards

बॅकलेस लूकमध्ये दिसली प्रियांकाची बहीण, इव्हेंटमध्ये पोहोचले वरुण, टाइगरसह बरेच स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मनारा आणि डेजी शाह)
मु्ंबई- बी-टाऊनचे अनेक सेलेब्स मंगळवारी (6 जानेवारी) लायन्स अवॉर्ड सोहळ्यात सामील झाले होते. प्रियांका चोप्रा, मनारा, डेजी शाह, वरुण धवन, टायगर श्रॉफ, अभिषेक बच्चनसह अनेक सेलेब्स सामील झाले होते.
या इव्हेंटमध्ये 'जिद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी प्रियांकाची कजिन मनारा बॅकलेस लूकमध्ये दिसली. तिने लहंगा आणि बॅकलेस चोली परिधान केलेली होती. मनारा आणि प्रियांकाने इव्हेंटमध्ये एकत्र पोज दिल्या. प्रियांका इव्हेंटमध्ये मधु चोप्रासोबत पोहोचली होती.
फराह खान, पूनम ढिल्लन, लीसा हेडन, डेजी शाह, प्रेम चोप्रा, उमंग कुमार, किकू शारदासह इतर स्टार्ससुध्दा इव्हेंटमध्ये दिसले. वेटरन अभिनेत्री सलमा आगासुध्दा कार्यक्रमात पोहल्या होत्या.
लायन्स गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात टायगर श्रॉफच्या पदार्पण 'हिरोपंती' सिनेमाला गौरविण्यात आले.
दिग्दर्शक अशुतोष गोवारिकर आणि रणदीप हुड्डा यांनासुध्दा कार्यक्रमावेळी स्पॉट करण्यात आले. लायन्स इंटरनॅशनल क्लबकडून मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी या अवॉर्ड सोहळ्याचे 21वे वर्ष आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...