आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vashu Bhagnani Completed 25 Film In Bollywood, Party Arrived In The Big Stars

PIX: वाशू भगनानींनी गाठला 25 सिनेमांचा टप्पा, दिली जंगी पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी यांनी फिल्म इंडस्ट्रीत एकुण 25 सिनेमांची निर्मिती केली. 'कुली नंबर 1', 'हीरो नंबर 1' यांसारख्या हिट सिनेमांची निर्मिती करणा-या वाशू भगनानी यांचे 'यंगिस्तान' आणि 'हमशक्ल' हे सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. इंडस्ट्रीतील आपला पंचवीस सिनेमांचा प्रवास साजरा करण्यासाठी वाशू भगनानी यांनी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक मंडळी सहभागी झाली होती.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, दिया मिर्झा, सुश्मिता सेन, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जेनेलिया डिसुजा, साजिद खान सतिश कौशिक, अनुपम खेर, चंकी पांडे, हिमेश रेशमिया, रवीना टंडन, रणधीर कपूर, अनु मलिक, लारा दत्ता, तुषार कपूर, राज कुंद्रासह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. पार्टीत वाशू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानीही हजर होता. फालतू आणि कल किसने देखा या सिनेमात जॅकी झळकला आहे.
अनेक सेलिब्रिटींनी वाशू भगनानी यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या...
अनुपम खेर - वाशू भगनानी यांना फिल्म इंडस्ट्रीत 25 सिनेमांचा टप्पा पुर्ण केल्यानिमित्त शुभेच्छा. मला 'ओम जय जगदीश' हा सिनेमा देण्यासाठी धन्यवाद. गुड लक!
रितेश देशमुख - 20 वर्षांत 25 सिनेमे. मला सहा सिनेमाचा भाग करण्यासाठी धन्वाद. मला तुमच्यासोबत भविषायात आणखी काम करायचे आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
सोफिया चौधरी - वाशूजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे यश मिळवणे अमेझिंग आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा वाशू भगनानी यांनी आयोजित केलेल्या शानदार पार्टीची खास
झलक...