आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीणा मलिकला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव ठेवले अबराम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वीणाचे पती असद बशीर खान मुलगा अबरामसोबत)
मुंबईः बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. वॉशिंग्टन डीसी (USA) येथील एका खासगी रुग्णालयात वीणाने आज गोंडस बाळाला जन्म दिला.
दुबईतील बिझनेसमन असद बशीर खानसोबत वीणा गेल्यावर्षी 25 डिसेंबरला लग्नगाठीत अडकली होती. तिचा येत्या 17 ऑक्टोबरला 'मुंबई 125 KM' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
वीणाचे पती असद बशीर यांनी मुलाच्या जन्माने खूप आनंदी आहेत. त्यांनी आपला हा आनंद ट्विटरवरुन व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले, "Thank you Allah Pak 4 blessing us wth a lovely son Abram Khan Khattak. @iVeenaKhan thx 4 giving me biggest happiness".
या दाम्पत्यानी आपल्या मुलाचे नाव अबराम असे ठेवले आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचेसुद्धा हेच नाव आहे. असद यांनी आपले बाळासोबतचे छायाचित्र ट्विटरवरुन पोस्ट करुन ट्विट केले, "Alhumdullilah we are blessed with a Baby Boy @iAbramKhan... cute son of Proud father @Asadbashirr".
असद बशीर यांच्यासोबत लग्नापूर्वी वीणाचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफ आणि अभिनेता अश्मित पटेलसोबत जुळले होते.