आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे वीणाला मोठा धक्का; म्हणाली, 'असे नाही होऊ शकत'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः वीणा मलिक)
दुबईः पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिका हिला ईशनिंदा प्रकरणी 26 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालावर वीणाने आश्चर्य व्यक्त केले आहे. तिने म्हटले, "26 वर्षे... म्हणजे संपूर्ण आयुष्य? कोर्ट एखाद्या स्त्रीला अशी कशी शिक्षा सुनावू शकतो जिने काही दिवसांपूर्वीचा बाळाला जन्म दिला. पाकिस्तानला परतून एक हॉस्पिटल सुरु करण्याच्या विचारात मी होते. ही शिक्षा खूपच हास्यास्पद आहे. मी निर्दोष आहे आणि या घटनेमुळे भावनात्मकरित्या ढासळले आहे."
वीणा मलिक अमेरिकेत मुलाला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यातच दुबईला परतली होती. वीणा पुढे म्हणाली, "आम्ही या डिसेंबरला पाकिस्तानला परतण्याचे प्लानिंग केले होते."
काय आहे प्रकरण ?
जियो टीव्हीचा मॉर्निंग शो 'उठो जागो पाकिस्तान' शाइस्ता लोधी होस्ट करते. या शोमध्ये वीणा मलिकच्या मेंदी आणि लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात एका म्युझिक बँडने सुफी गाणे गायले होते. त्यामुळे कट्टपंथी संघटना नाराज झाल्या होत्या. ते गाणे होते, 'अली के साथ है जहरा की शादी'. त्यावेळी उलेमा पॅनलने तर जियो टीव्ही पाहाणे देखील 'हराम' असल्याचे म्हटले होते. एआरवाय न्यूज अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार मुबाशिर लुकमान यांनी या शो आणि लग्नातील गाण्याचा जोरदार विरोध केला होता.
पुढे वाचा, सर्व दोषी पाकिस्तान बाहेर...