आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actress Veena Maliks Baby Gets Ready To Meet The World!

मुलगा अबराम आणि पतीसोबत फिरण्याचा आनंद लुटतेय वीणा मलिक, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा अबराम आणि पती असद बशीर खानसोबत वीणा मलिक)
मुंबईः बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक सध्या पती असद आणि नवजात बाळ अबरामसोबत फिरण्याचा आनंद घेत आहे. 22 सप्टेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी येथे वीणाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अद्याप तिचा मुलगा एक महिन्याचा व्हायचा आहे. मात्र ती पती आणि आपल्या मुलासोबत आउटिंग करत आहे.
वीणाचे पती असद यांनी अलीकडेच पत्नी आणि मुलासोबतची काही छायाचित्रे ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत. मुलाच्या जन्मानंतर असद यांनी ट्विट केले होते, "Thank you Allah Pak 4 blessing us wth a lovely son Abram Khan Khattak. @iVeenaKhan thx 4 giving me biggest happiness". इतकेच नाही तर त्यांनी आपल्या मुलाचेसुद्धा ट्विटर अकाउंट ओपन करुन ट्विट केले होते, "Alhumdullilah we are blessed with a Baby Boy @iAbramKhan... cute son of Proud father @Asadbashirr".
आई झाल्यानंतर वीणाने dainikbhaskar.com शी बोलताना म्हटले होते, "आज मला जगातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे. आई झाल्यानंतर एक स्त्री सर्वकाही प्राप्त करते. मी आयुष्यात यश, पैसा, प्रसिद्धी मिळवली. मात्र आई झाल्यानंतर पैशांना महत्त्व उरत नाही."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आपल्या गोंडस बाळासोबत असद आणि वीणा कसे सेलिब्रेट करत आहेत...