आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दारा सिंग यांचा जीवनप्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिवसांपासून जीवन-मृत्युशी संघर्ष करणा-या दारा सिंग यांनी आज सकाळी साडे सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. कुस्तीच्या आखाड्यापासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणा-या दारा सिंग यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घ्या...
दारा सिंग यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ रोजी अमृतसरच्या धरमूचकमध्ये झाला होता. दारा सिंग यांच्या आईचे नाव बलवन्त कौर आणि वडिलांचे नाव सूरत सिंग रंधावा होते. दारा सिंग यांचे बालपणीच लग्न झाले होते. वयाच्या १७व्या वर्षी ते एका मुलाचे वडील झाले होते. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. दारा सिंग यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. नामवंत पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेले दारा सिंग यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. कुस्तीचा आखाडा असो किंवा बॉलिवूड जगत, दारा सिंग यांनी दोन्ही ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.