(फाइल फोटो- साधना)
मुंबई- गतकाळातील प्रसिध्द अभिनेत्री साधना मुंबईच्या के के जे सोमैय्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. बातमी आहे. की त्यांनी प्रकृती खालावली आहे.
साधना यांना तोंडाचा कर्करोग आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, साधना यांना अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने त्यांची प्रकृती नाजूक आहे. मात्र अद्याप साधना यांच्या कुटुंबीयांनी आणि हॉस्पिटलमधून कोणतेही स्पष्टीकरण मिळले नाही.
73 वर्षीय साधना 1960 आणि 70 दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील होत्या. 1955मध्ये त्या पहिल्यांदा राजकपूर अभिनीत 'श्री 420' सिनेमाच्या 'मुड मुड के न देख मुड मुड के'मध्ये कोरस गर्लच्या रुपात दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'लव इन शिमला' (1960), 'प्रेम पत्र' (1962), 'राजकुमार' (1964), '
आप आए बहार आई' (1971), 'हम सब चोर है' (1973) आणि 'छोटे सरकार' (1974)सारख्या हिट सिनेमांत काम केले आहे.