आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veteran Marathi Actress Smita Talwalkar Passed Away

अवखळ, उत्साही, शाळकरी स्मिता; पुण्यातील शिक्षिकेने जागवल्या आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 45 वर्षांपूर्वीची शाळकरी स्मिता आजही डोळ्यांसमोर आहे. देखणी, अवखळ पण विलक्षण उत्साही होती. शाळेचे सर्व उपक्रम, स्नेहसंमेलने, स्पर्धांमध्ये ती हिरीरीने भाग घ्यायची आणि यशही मिळवायची.. स्मिता तळवलकरच्या पुण्यातील हुजूर पागेतल्या बाई जयश्री बापट सांगत होत्या..

स्मिताचे शाळकरी रूप विलोभनीय होते, हे सांगताना बापट बार्इंचा स्वरही भारावला होता. त्या म्हणाल्या, माझ्या आठवणीतील स्मिता सतत नाटक, स्पर्धा आणि त्यासाठीच्या तालमींमध्ये रमलेलीच आहे. अगदी छोटी असल्यापासूनच तिला नाटकाचे, अभिनयाचे वेड होते. शाळेतील तालमी ती कधीच चुकवत नसे.

शाळेला सुट्या लागल्या तरी ती मुख्याध्यापिका मालती साठे यांच्या घरी राहायची. एकदा तालमी घेणार्‍या बार्इंचा चेहेरा काळजीचा वाटला. स्मिताने विचारले, बाई, काय झाले. त्यावर बाई म्हणाल्या, अगं. तू मराठी नाटकात काम करते आहेस. पण हिंदी नाटकही बसते आहे. तू मराठीत आहेस म्हणून तुला हिंदीत घ्यायचे नाही, असे ठरते आहे. ते ऐकून स्मिता विचलीत न होता म्हणाली, बाई, तुम्ही काळजीच करू नका, मी दोन्हीकडे काम करणार, हे निश्चित समजा. आणि खरंच, स्मिताने दोन्ही भाषेतील नाटकांत उत्तम भूमिका केल्या आणि सर्व बक्षिसे पटकावलीत.. ! पुढे कलाजीवनात यशस्वी झाल्यावरही तिने शाळेचे, बार्इंची नाव सतत जनसमूहांसमोर सांगितले. त्याविषयीची कृतज्ञता तिने कायम जपली, याचा आनंद आम्हाला नेहमी वाटतो. ती नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, अशा भावना बापटबाई यांनी व्यक्त केल्या.