आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड कलाकारांनी साश्रुनयनांनी दिला अभिनेत्री नंदाला अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या काळातील प्रख्यात अभिनेत्री बेबी नंदा यांचे मंगळवारी (26 मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या.मुंबईत मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूडकरांनी साश्रुनयांनी नंदा यांना अखेरचा निरोप दिला. नंदा यांच्या अंत्यसंस्कारात वहिदा रहमान, आशा पारेख यांच्यासह बरेच कलाकार सहभागी झाले होते.
बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात...
बेबी नंदा या नावाने त्यांनी 1948 मध्ये 'मंदिर' या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर बालकलाकाराच्या रुपात पाऊल ठेवले आणि शेवटपर्यंत त्यांच्या नावापुढे 'बेबी' हा शब्द जोडलेला राहिला. बेबी नंदा यांनी बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु या सिनेमांध्ये काम केले. त्यानंतर मुख्य भूमिकेत, बहिणीच्या रुपात, पत्नीच्या रुपात, आईच्या रुपात आणि खलनायिका म्हणूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या.
तरूणपणीचे 'जब जब फूल खिले', 'तीन देवियां', 'दी ट्रेन', 'भाभी', 'काला बाजार', 'धूल का फूल', 'छोटी बहन', 'हम दोनों', 'गुमनाम' या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. त्यांचे सर्व सिनेमे खूप गाजले. सिल्व्हर स्क्रिनवर नंदा यांची जोडी शशी कपूर यांच्यासह खूप गाजली. या दोघांनी एकूण आठ सिनेमांत एकत्र काम केले होते. नंदा यांचे नाव पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. 'आंचल' या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. बेबी नंदा यांचा 'प्रेमरोग' (1983) हा शेवटचा सिनेमा होता.
सिनेसृष्टीपासून संन्यास घेतल्यानंतर नंदा आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाच भेटायच्या. वहिदा रहमान, हेलन आणि साधन या त्यांच्या जवळच्या मैत्रीणी होत्या. सार्वजनिक जीवनापासून अलीकडे त्या दूरच होत्या. सार्वजनिक ठिकाणी त्या सहसा हजेरी लावत नव्हत्या. मात्र 2010मध्ये 'नटरंग' या मराठी सिनेमाच्या प्रीमिअरवेळी त्या वहिदा रहमान, हेलन आणि साधना यांच्यासह दिसल्या होत्या.