मुंबई: नुकतेच मुकेश अंबानीने अधिकृतरीत्या नेटवर्क 18 समूहाचा कार्यभार हाती घेतला आहे. त्यामध्ये वायकॉम 18 या सिनेमा स्टुडिओचादेखील समोवश आहे.
नेटवर्क 18 च्या अखत्यारीतील सर्व कंपन्याचे अधिकार मुकेश अंबानींकडे आले आहेत. सध्या या कंपन्यांच्या सर्व विभागांच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल घडून येत आहे. प्रत्येक विभाग एका कॉर्पोरेट विभागामध्ये रूपांतरित करण्यात येत आहे. शिवाय करमणुकीशी संबंधित असलेल्या वायकॉम 18 या स्टुडिओच्या कार्यशैलीमध्येदेखील बर्याच नावीन्यपूर्ण गोष्टींना स्थान देण्यात येत आहे.
वायकॉमच्या ऑफिसमध्ये यापूर्वी दारू, बिअर पिणे, धूम्रपान करणे या गोष्टी सामान्य मानल्या जात होत्या. मात्र, आता या सर्व गोष्टींवरती बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्व्हिंग ड्रिंक्स म्हणून प्रचलित असलेल्या लस्सी आणि ताकाला ऑफिसमध्ये भरभरून मागणी आहे. याला गुजराती संस्कृती म्हणावे की दुसरे काही. एवढे मात्र नक्की, अंबानीनी फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वच स्तरावर बदल घडवणे सुरू केले आहे. शिवाय सिनेमांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या सिनेमावर किती पैसे लावावेत, याचा आराखडा तयार करण्यासाठी एक रिसर्च टीम सध्या काम करत आहे.