आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victoria's Secret Fashion Show Heading To London For The First Time

लंडनमध्ये पहिल्यांदाच होणार Victoria's Secret fashion show

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात ग्लॅमरस अंतरवस्त्र फॅशन शो होणार आहे. या फॅशन शोमध्ये जगातील अनेक इंटरनॅशनल सुपरमॉडेल भाग घेणार आहे. 192 देशांमध्ये हा कार्यक्रमा प्रसारित केला जाणार आहे. सांगितले जात आहे, की 'व्हिक्टोरिआ सीक्रेट फॅशन शो' नावाचे प्रसिध्द हा कार्यक्रमा 1998पासून लंडनमध्ये फॅशन शो करण्याचा प्रयत्न करत होता.
एवढ्या वर्षांनंतर पहिल्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन लंडनमध्ये होणार आहे. परंतु असेही सांगितले जात आहे, की या कार्यक्रमासाठी मॉडेल्स कोणत्या घ्यायच्या आहेत याचे निर्णय अद्याप झालेला नाहीये. बातमी आहे, की ब्रिटीश मॉडेल कारा डेलिव्हिंगनेकडून तारिख घेतली जात आहे.
कारासुध्दा या फॅशन शोसाठी उत्साही आहे. सर्वात पहिले हा शो न्यूयॉर्कच्या प्लाझा हॉटेलच्या जवळ 1995मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमात प्रसिध्द मॉडेल्सने सहभाग घेतला होता. त्यामध्ये नाओमा कँपबेल, हेलेना क्रिस्टेनसन आणि टायरा बँक इत्यादी मॉडेल्सचे मुख्य नाव सामील आहेत.
ब्रझिलिअन सुपरमॉडेल लीनाचे म्हणणे आहे, की या शोसाठी ती खूप उत्साही आहे. लीनाने सांगितले, की हा जगातील सर्वात मोठा फॅशन शो आहे. आम्हाला आनंद आहे, की हा कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहे. व्हिक्टोरिआ सीक्रेटचे जगभरात एक हजारांपेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 2013मध्ये झालेल्या व्हिक्टोरिआ सीक्रेट फॅशन शोची काही छायाचित्रे...