आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फिल्मिस्तान'च्या स्क्रिनिंगला पोहोचले तब्बू, विद्यासह अनेक स्टार्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये काल (26 मे) 'फिल्मिस्तान' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त बॉलिवूडचे काही प्रसिध्दी चेहरे उपस्थित होते. स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्समध्ये विद्या बालन आणि तिचा पती सिध्दार्थ राय कपूर, तब्बू, सुशांतसिंग राजपूत आणि त्याची लिव्ह-इन-पार्टनर अंकिता लोखंडे, आनंद गांधी, विक्रमादित्य मोटवाणी आणि अमृता पुरीसह अनेक स्टार्स सामील झाले होते.
'फिल्मिस्तान' एक अशा सनी अरोडा नावाच्या तरुणाची कहानी, जो अभिनेता होण्यासाठी मुंबईला जातो. परंतु त्याला यश मिळत नाही. पराभव होऊन तो एका परदेशी यूनिटशी जोडल्या जातो. त्यानंतर तो सहाय्यक दिग्दर्शक बनतो. सिनेमाच्या शुटिंगसाठी राजस्थानच्या सीमेवर गेलेल्या सनीला काही पाकिस्तानी उचलून नेतात. त्यानंतर सिनेमाच्या कहानीला नवीन वळण येते. सनी भारतात कसा परत येतो आणि पाकिस्तानमध्ये त्याला कसा अनुभव येतो याच्याभोवती सिनेमाची कहानी गुंफण्यात आलेली आहे.
नितिन कक्करने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये कुमुद मिश्रा, शरीब हाशमी, इनामुल्लाक, गोपाल दत्त, वसीम खान, सरोज शर्मा, तुषार झा आणि संजय मेहता यांच्या मुख्य भूमिका आहेत. सर्वाधिक नवीन चेहरे असूनदेखील या सिनेमाने 2012मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कर सिनेमाने आपल्या नावी केले आहेत. परंतु सिनेमाला रिलीजसाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली. 6 जूनपासून तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघू शकता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...