आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : 'बॉबी जासूस'च्या स्क्रिनिंगमध्ये विद्या, दीयासह दिसले हे सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीया मिर्जा, अभिनेता अली फैजल आणि विद्या बालन
मुंबई - आपल्या आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री विद्या बालन खूप मेहनत घेत आहे. येत्या 4 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे. सिनेमाचे प्रदर्शन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात येत आहे.
बुधवारी मुंबईतील लाइट बॉक्समध्ये या सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. अभिनेता पंकज कपूर आपल्या कुटुंबासह स्क्रिनिंग स्थळी पोहोचले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी सुप्रिया पाठक आणि अभिनेत्री तन्वी आझमी होत्या. तर फोटोग्राफर अतुल कस्बेकर, सिनेमाची निर्माती दीया मिर्झा, अभिनेता अली फैजल, अभिनेता अर्जुन बाजवा यांनीही स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी विद्या ग्रीन कलरच्या कुर्त्यात दिसली.
'बॉबी जासूस' हा सिनेमा समर शेख यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कथा बॉबी नावाच्या तरुणीभोवती गुंफण्यात आली असून हैदराबादमधील ओल्ड सिटी एरियातील ती नंबर वन जासूस असते. या सिनेमात विद्या वेगवेगळ्या बारा रुपात झळकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बॉबी जासूस'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...