आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Vidya Balan's Different Looks In Saree On Her Birthday.

विद्याच्या 14 फेव्हरेट साड्या, जाणून घ्या कोणत्या प्रकारची साडी नेसणे पसंत करते विद्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन)

बॉलिवूडमधील प्रगल्भ अभिनेत्रीच्या रुपात ओळख निर्माण करणारी विद्या अशी एक अभिनेत्री आहे, जी साडीत सर्वात सुंदर दिसते. ट्रेडिशनल इंडियन वेअरमध्ये ती स्टनिंग दिसते. 'परिणीता' या आपल्या पहिल्याच सिनेमात साडी परिधान करुन तिने सिद्ध केले, की अभिनयाचा अर्थ ग्लॅमरस दिसणे नव्हे. त्यानंतर आपल्या ब-याच सिनेमांमध्ये विद्या एथनिक वेअरमध्ये दिसली. सिनेमांव्यतिरिक्त अवॉर्ड शोज, इव्हेंट्स, इतकेच कशाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील विद्या साडीत अवतरली.
परिणीता, भूल भुलैय्या, द डर्टी पिक्टर यांसह अनेक सिनेमांमध्ये विद्या प्रेक्षकांना साडीत पसंत पडली. विद्या साडीसोबत क्वार्टर स्लीव्स ब्लाउज योग्यप्रकारे कॅरी करते. विद्या अशा काही पद्धतीने साडी परिधान करते, की साडीतसुद्धा ती सेक्सी दिसते.
आज विद्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला विद्याचे साडीतील विविध लूक्स दाखवत आहोत. शिवाय तिला कोणत्या प्रकारची साडी परिधान करणे पसंत आहे, हे देखील तुम्हाला येथे कळेल.