आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोलकाताच्या रस्त्यांवर फिरली विद्या, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री विद्या बालन आपल्या आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतभर फिरत आहे. हैदराबाद आणि मुंबईत सिनेमाचे प्रमोशन केल्यानंतर विद्या 28 जून रोजी कोलकात्यात पोहोचली होती. येथे ती एक पत्रकार परिषदेत सहभागी झाली होती.
पत्रकार परिषदेच्यास्थळी विद्या रिक्शातून पोहोचली होती. तिने यावेळी पर्पल कलरच्या सूट आणि कॅनव्हासचे शूज घातले होते. तिच्याकडे एक बॅग होती, ज्यात बिस्किटचे पाकिट होते. इवेंटमध्ये विद्याला तिच्या आवडत्या फिफा टीमविषयी विचारले असता, ती म्हणाली, मी केवळ मॅसी ओळखते, कारण तो चांगला दिसतो. जेव्हा माझे मित्र मला मॅसीच्या मॅचविषयी सांगतात, तेव्हा मी टीव्ही लावून त्याची मॅच बघते. याव्यतिरिक्त मला या खेळात रुची नाहीये.
'बॉबी जासूस' हा सिनेमा समर शेख यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कथा बॉबी नावाच्या तरुणीभोवती गुंफण्यात आली असून ती हैदराबाद येथील ओल्ड सिटी एरियातील नंबर वन जासूस आहे. या सिनेमात विद्या वेगवेगळ्या बारा रुपात झळकणार आहे. यावर्षी 4 जुलै रोजी रिलीज होणा-या या सिनेमाची दीया मिर्झा निर्माती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रमोशनसाठी कोलकाता येथे पोहोचलेल्या विद्या बालनची छायाचित्रे...