गरोदर असल्याच्या खोट्या अफवांमुळे विद्या बालन त्रस्त झाली आहे. ती गरोदर असून चित्रपट सोडणार आहे, अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळत होत्या. याबाबत नाराज होत विद्या बालनने सांगितले की, 'माझी तब्येत ठीक नसल्याने काही चित्रपटांचे प्रस्ताव मी स्वीकारले नाहीत.' ती सुजॉय घोषच्या 'दुर्गा रानी सिंह' आणि मोहित सुरीच्या 'हमारी अधुरी कहानी' या चित्रपटातून बाहेर पडली आहे. फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यातदेखील ती सहभागी झाली नाही.
विद्याने सांगितले की, 'मी गरोदर असल्याच्या अफवांमुळे खरोखरच चिंताग्रस्त होते. कुणीही वाट्टेल तेव्हा मला हाच प्रश्न विचारतोय.'