आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: सिनेमाच्या यशासाठी विद्याने मागितली दुआ, टॅक्सीने पोहोचली दर्ग्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहिम दर्ग्यात विद्या बालन
मुंबई - अभिनेत्री विद्या बालन आपल्या आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या यशासाठी बरीच मेहनत घेत आहे. एकीकडे ती सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे, तर दुसरीकडे देवाकडे यशासाठी साकडेसुद्धा घालत आहे.
गुरुवारी रात्री विद्या मुंबई स्थित माहिम दर्ग्यात पोहोचली. टॅक्सीने ती दर्ग्यात पोहोचली. तिची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी यावेळी जमली होती. दर्ग्यात पोहोचल्यानंतर विद्याने आपल्या डोक्यावर एक टोपली घेतली होती. त्यामध्ये दर्ग्यावर चढवण्यात येणारी चादर आणि फूले होती. यावेळी विद्या पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिने डोक्यावर काळ्या रंगाची ओढणी घेतली होती. विद्याने चादर चढवून आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.
विद्याचा 'बॉबी जासूस' हा सिनेमा येत्या 4 जुलै रोजी रिलीज होतोय. हा सिनेमा समर शेख यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कथा बॉबी नावाच्या तरुणीची असून ती हैदराबाद येथील ओल्ट सिटी एरियातील नंबर वन जासूस आहे. या सिनेमात विद्या वेगवेगळ्या 12 भूमिकांमध्ये झळकणार आहे. यासाठी विद्याने तब्बल 122 लूक टेस्ट दिले होते. अभिनेत्री दीया मिर्झा या सिनेमाची निर्माती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दर्ग्यात पोहोचलेल्या विद्या बालनची छायाचित्रे...