आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मंजूनाथ'च्या स्क्रिनिंगला विद्यासह पोहोचले बी-टाउनचे सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड 'मंजूनाथ' या आगामी सिनेमाचे मुंबईमध्ये स्क्रिनिंग ठेवण्यात आले. त्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्सनी हजेरी लावली. या स्क्रिनिंगमध्ये विद्या बालनसुध्दा दिसली. नेहमी माध्यमांसमोर येणारी विद्या मागील काही दिवसांपासून थोडी दूर होती. त्यामुळे तिच्या उपस्थितीने या स्क्रिनिंगची शोभा वाढवली.
मागील काही दिवसांपासून विद्याच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सातत्याने माध्यमांमध्ये येत होत्या. तसेच अलीकडे, एक बातमी अशीही आली आहे, की विद्या आणि तिचा पती सिध्दार्थ यांच्या नात्यात खटके उडण्यास सुरूवात झाली आहेत. परंतु विद्या या स्क्रिनिंगवेळी खूप आनंदी दिसून येत होती. यावेळी IIFA अव़ॉर्ड्समध्ये सामील होण्यासाठी बॉलिवूडचे सर्वच स्टार्स यूएसला गेले होते. परंतु विद्या या कार्यक्रमात सामील झाली नव्हती. ती इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबर्न (IIFFM)मध्ये सामील झाली होती.
'मंजूनाथ'च्या स्क्रिनिंगमध्ये विद्या खूपच साध्या लूकमध्ये दिसली. तिने हिरव्या रंगाचा अनारकली कुर्ता परिधान केलेला होता. तसे पाहता विद्या प्रत्येक कार्यक्रमात साडीच्या लूकमध्ये दिसते. विद्याने अलीकडेच रिजील झालेल्या 'शादी के साइड इफेक्ट्स'मध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यामध्ये तिचा को-स्टार फरहान अख्तर होता.
'मंजूनाथ' खनिज तेल माफियांवर आधारित सत्य घटनेचा सिनेमा आहे. सिनेमात यशपाल मुख्य भूमिकेत असून संदीप वर्माने याचे दिग्दर्शन केले आहे. वायकॉम18ने सिनेमा निर्मित केला आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी (9 मे) रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा 'मंजूनाथ'च्या स्क्रिनिंगची काही खास छायाचित्रे...