आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्याची छोट्या चाहत्यांसह धमाल-मस्ती, पाहा प्रमोशन इव्हेंटची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या चाहत्यांसह अभिनेत्री विद्या बालन
मुंबई: अभिनेत्री विद्या बालनचा 'बॉबी जासूस' रिलीज झाला आहे. अनेक समीक्षकांनी सिनेमाला दीड ते तीन स्टार्स दिले आहे. सिनेमाला मिळालेल्या रेटींगमुळे विद्या समाधानी आहे. तिने शुक्रवारी (4 जुलै) सिनेमा संबंधीत एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. तिथे तिने छोट्या चाहत्यांसह धमाल केली.
विद्या इव्हेंटमध्ये लाल रंगाच्या आउफिटमध्ये दिसली. तिने खांद्यावर एक बॅग अडकवलेली होती आणि कॅनव्हास शुज घातलेले होते. प्रमोशनदरम्यान विद्या ज्या साध्या लूकमध्ये दिसत आहे असाच एक लूक 'बॉबी जासूस'मध्येही आहे. इव्हेंटमध्ये तिने मुलांना सिनेमाची सीडी वाटली. सोबतच, त्यांच्यासह डान्सदेखील केला. इव्हेंटचे आयोजन एक मॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी तिला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.
'बॉबी जासूस'चे दिग्दर्शन समर शेखने केले आहे आणि दिया मिर्झाने निर्मिती केली आहे. सिनेमात विद्यासह अली फैजलने काम केले आहे. हा बॉलिवूडचा पहिला असा सिनेमा ज्यामध्ये एका अभिनेत्री गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या विद्याने छोट्या चाहत्यांसह कशी धमाल केली...