आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा एक रूपयाही माझ्याकडे नाही- गलानी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्‍टार सलमान खान आणि निर्माता विजय गलानी यांच्‍यातील मानधनावरून झालेला वाद सध्‍या चर्चेत आहे. गलानी यांनी त्‍यांच्‍याकडे सलमानचा एक रूपयाही नसल्‍याचे नुकतेच स्‍पष्‍ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी गलानी यांनी सलमानला 'वीर' या चित्रपटाचे मानधन अद्याप दिलेले नाही अशी बातमी आली होती. सलमानने हे प्रकरण 'फेडरेशन ऑफ वेस्‍टर्न इंडिया सिने एम्‍प्‍लॉइज'पर्यंत (एएफडब्‍ल्‍यूइसीइ) नेले होते. मात्र, गलानी यांनी या माहितीत तत्‍थ्‍य नसल्‍याचे सांगितले आहे.
एका इंग्रजी वृत्‍तपत्रास मुलाखत देताना गलानी म्‍हणाले की, 'सलमानला जर काही त्रास असेल तर त्‍याने माझ्याशी बोलावे. 'वीर' प्रदर्शित झाल्‍यानंतर सात- आठवेळा मी सलमानला भेटलो. पण, तेंव्‍हा तो याबाबत काहीच बोलला नव्‍हता.'
ते पुढे म्‍हणाले, 'माझ्याविरोधात कुणीतरी षडयंत्र रचत आहे. मी सलमानचे पैसे अडवून ठेवलेत अशी अफवा पसरवण्‍याची गरज नव्‍हती. मी त्‍याची पै न् पै दिलेली आहे. मी त्‍याला मानधन दिले नाही याचा पुरावा कोणीही सादर करू शकणार नाही.'
तसेच, एफडब्‍ल्‍यूइसीइवर टीका करत गलानी म्‍हणाले की, 'मी असोसिएशन ऑफ मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स (एएमपीपी) या संस्‍थेचा सदस्‍य नसल्‍याने 'एएफडब्‍ल्‍यूइसीइ' मला कोणत्‍याही प्रकारची नोटीस पाठवू शकत नाही.'
आता विजय गलानीच्‍या या स्‍पष्‍टीकरणावर सलमानची प्रतिक्रिया काय असेल ते पाहायचे.