आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्वीन’ला लागली कथेची ‘कॉपी’ करण्याची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला अणि अनपेक्षितपणे नायिकाप्रधान चित्रपट असूनही त्याने यश मिळवले. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये चालू आहे. मात्र या यशाचा मुकूट घातलेल्या ‘क्वीन’ला कॉपी करण्याची नजर सध्या लागली आहे. अभिग्यान झा यांच्या ‘फिर जिंदगी’ या चित्रपटाच्या कथानकाची नक्कल 'क्वीन'ने केल्याचा झा यांनी बहल यांच्यावर आरोप केला आहे.
झा यांनी 2006मध्ये बहल यांना 'फिर जिंदगी'चा एक प्रिव्हयू आपल्या घरी दाखवला होता. 'फिर जिंदगी'मध्ये गुल पनाग आणि मिलिंद सोमण यांनी भूमिका केली होती. त्यात अगदी 'क्वीन'सारखेच गुल पनाग स्वत:चा शोध घेण्यासाठी एकटीच हनीमूनला जाते असे कथानक आहे. 'क्वीन'मधील कॉफी शॉपमधील सुरुवातीचा व राणी पूर्णत: बदलल्यानंतरचा कॉफी शॉपमधला सीन तंतोतंत 'फिर जिंदगी'मधून उचलल्याचे झा यांचे म्हणणे आहे. याशिवाय बरेच प्रसंग हे कमालीचे साधर्म्य असणारे आहेत असे झा यांचे म्हणणे आहे.
बहल यांनी मात्र अजून यावर काही भाष्य केलेले नाही. बहल सध्या ‘शानदार’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे तर क्वीन म्हणजे कंगना राणावत 'रिव्हॉल्व्हर रानी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे त्यामुळे या कॉपीच्या मुद्यावर 'क्वीन'च्या वतीने कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. आता 'क्वीन' यशाच्या वाटेवर चांगली घोडदौड करीत असतानाच झा यांना हा कॉपीचा मुद्दा उठवावासा वाटला की बॉलिवूडच्या कॉपी करण्याच्या सवयीप्रमाणेच हीदेखील एक कॉपी आहे, खरे काय ते झा आणि बहलच जाणे !!