आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिस्टर एक्स’ मध्ये विक्रम भट्ट व्यस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘..केस’नंतर विक्रम भट्ट यांचा कोणताही सिनेमा आला नव्हता. सध्या ते इम्रान हाश्मीसोबत ‘मिस्टर एक्स’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. ‘अंकुर अरोरा र्मडर केस’नंतर विक्रम भट्ट यांचा कोणताही सिनेमा आला नव्हता. यादरम्यान ते ‘इश्क किल्स’या टीव्ही शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसले होते. सध्या ते इम्रान हाश्मीसोबत ‘मिस्टर एक्स’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमाबरोबरच ते बिपाशा बसू अभिनीत ‘क्रिएचर’या थ्रीडी सिनेमाच्या रिलीजची तयारी करत आहेत.
दरम्यान, यापुढची वाटचाल विक्रमसाठी थोडीशी अडचणीची व त्रासदायक ठरणार, असे दिसते. कारण, विक्रम यांना तीन-तीन लोकांनी साइन केले आहे. त्यांना सुरुवातीलाच एकता कपूर, अतुल अग्निहोत्री आणि रतन जैनने आपापल्या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी साइन केले आहे. आतापर्यंत विक्रम यांनी पहिला सिनेमा कोणाचा करायचा, हे अद्याप ठरवलेले नाही. यादरम्यान एकता आणि अतुल दोघेही आपले सिनेमा बनवण्याचे काम लवकरच सुरू करणार आहेत. यामुळे विक्रम यांची मोठी पंचाईत होणार, असे दिसते आहे.