आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हीरोपंती'मध्ये रागीट हरियाणवी जाटच्या भूमिकेत दिसणार विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'या रब' सिनेमात विक्रम सिंह दिसला होता. आता तो 'हीरोपंती' सिनेमातसुध्दा अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहे. परंतु या सिनेमात त्याचा नवीन अवतार आपल्याला बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरलासुध्दा लाँच करण्यात आले आहे. विक्रम एका रागीट हरियाणवी जाटची भूमिका साकारणार असून त्याचे नाव 'रज्जो फौजी' असणार आहे. ही भूमिका एका अँटी हीरोची आहे.
विक्रम याविषयी सांगतो, 'या सिनेमात मुख्य अभिनेत्रीसोबत माझ्यावर एक रोमँटिक गाणेसुध्दा चित्रीत करण्यात आले आहे. सिनेमात टायगर नायिकेसाठी माझ्याशी फाइट करताना दिसणार आहे.' 'हीरोपंती'मध्ये विक्रम एक बॉक्सिंग चॅम्पिअन आहे आणि तो बॉक्सिंगमध्ये चांगला ट्रेन्ड झालेला अभिनेता आहे. जेव्हा विक्रम काही वर्षांपूर्वी न्यूझिलंडमध्ये होता तेव्हा त्याने बॉक्सिंगची प्रशिक्षण घेतले होते.
विक्रम पुढे सांगतो, 'बॉक्सिंग चॅम्पची भूमिका माझ्यासाठी सोपी होती. कारण मी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. मला हा खेळ ओळखीचा असल्याने माझ्यासाठी अ‍ॅक्शन सीन करणेसुध्दा कठिण नव्हते.'