आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह लांडगा बनून हॉलिवूडला टक्कर देणार 'अपरिचित'चा हीरो, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('आय'च्या एका दृश्यात अभिनेता विक्रमचे वेयरवुल्फ रुप)
मुंबईः हिंदी आणि मराठी भाषिक सिनेरसिकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांविषयी नेहमी उत्सुकता बघायला मिळते. मग स्पेशल इफेक्ट्स असलेले फाइट सीन असो, किंवा दाक्षिणात्य कलाकारांचा फास्ट बीट्सवर डान्स, या सिनेमांमधील सर्व बाबी सिनेरसिकांना आकर्षित करणा-या असतात. अशाच एक सिनेमा सध्या दक्षिणेत तयार होत असून त्याचे नाव 'आय' (I) असे आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे.
तामिळ सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. शंकर यांनी यापूर्वी रजनीकांत स्टारर 'एंथिरन' (हिंदीत रोबोट), 'शिवाजी: द बॉस', 'नायक', 'इंडियन', 'ब्वॉयज' 'अन्नियान' (अपरिचित) आणि 'ईराम' या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 'आय' या सिनेमावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरु आहे. अलीकडेच म्हणजे सोमवारी या सिनेमाचे ऑडिओ लाँच हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आर्नोल्ड श्वार्जनेगर यांच्या उपस्थितीत चेन्नईत करण्यात आले. स्वतः आर्नोल्ड यांनी शंकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'आय' या तामिळ सिनेमात प्रसिद्ध अभिनेता विक्रम मेन लीडमध्ये आहे. विक्रम आणि शंकर या जोडीने यापूर्वी अन्नियान (अपरिचीत) या सिनेमासाठी एकत्र काम केले होते. याशिवाय एमी जॅक्सन आणि उपेन पटेल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. शंकर यांचे मागील सिनेमे बघितले असता, तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा हॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत कुठेच मागे नाहीये. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला 'एंथिरन' (रोबोट) हा सिनेमा तामिळमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'हॅरी पॉटर', 'अॅवेंजर्स', 'एक्स मॅन' सीरीज, 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' आणि 'पॅसेफिक रिम' यांसारख्या हॉलिवूड सिनेमांसाठी काम करणारे टेक्निशियन शंकर यांच्या 'आय' सिनेमाला हॉलिवूड सिनेमांशी टक्कर देण्यासाठी कसे तयार करत आहेत, ते सांगत आहोत. सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सपासून ते मेकअपपर्यंत सर्व गोष्टींवर बारकाईने काम केले जात आहे.
वेटा वर्कशॉपचा मेकअप...
'आय' सिनेमातील पात्रांचा मेकअप न्यूझिलंडची प्रसिद्ध मेकअप कंपनी असलेल्या वेटा वर्कशॉपने केला आहे. वेटाने यापूर्वी 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' आणि 'हॉबिट' या सिनेमातील कॅरेक्टर्सचा मेकअप केला आहे. वेटाचे रिचर्ड टेलर आणि पीटर जॅक्सन यांनी आय सिनेमात विक्रमच्या पात्राला स्पेशल इफेक्ट्स दिले आहेत. (वरील छायाचित्रात विक्रमचा मेकओव्हर वेटा वर्कशॉपची कमाल आहे.)
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या हॉलिवूडमधील कोणत्या सिनेमाची टीम आय सिनेमाच्या कोणत्या सेक्शनमध्ये काम करत आहे. शिवाय पाहा या सिनेमाचा ट्रेलर...