आतापर्यंत विपुल शहाने अॅक्शन आणि नायकप्रधान सिनेमा केले आहेत. उदाहरणार्थ, ‘सिंग इज किंग’, ‘कमांडो’ आणि ‘हॉलिडे..’. या वेळी मात्र तो नायिकेवर आधारित असलेला सिनेमा बनवत आहे. त्याचे नाव ‘जिंदगी एक पल’ असून त्यात प्रमुख भूमिका पूजा चोप्रा आणि मीरा चोप्रा साकारणार आहे.
पूजाला विपुलने ‘कमांडो’ सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत आणले. मात्र, यानंतर तिला एकही सिनेमा मिळाला नाही. ‘रुपनगर के चीते’ आणि या सिनेमाबरोबर विपुल तिला रुपेरी पडद्यावर आणणार आहे. मीराने ‘गँग ऑफ घोस्ट्स’ मध्ये भूमिका साकारली, पण ती आपली वेगळी ओळख बनवू शकली नव्हती. याशिवाय नवोदित अभिनेत्री तनीषा पवारदेखील या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.