आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर दासचा आगामी चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना रनोटसोबत 'रिव्हॉल्वर राणी'मध्ये करमणूक केल्यानंतर वीर दास 'अमित साहनी की लिस्ट' या चित्रपटात दिसणार आहे. या रोमॅँटिक-कॉमेडी चित्रपटात वीर दासबरोबर तीन अभिनेत्री आहेत. अजय भुयानच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या संगीतामध्ये रसूल पोकुट्टीसारख्या ऑस्कर विजेत्या कलावंताचे नाव जोडले गेले आहे. रसूल यांनीच चित्रपटाचे संपूर्ण संगीत रचले आहे. रघू दीक्षित, एलियन चटनी आणि पलाश मुच्छाल यासारख्या गायकांनी व बॅँड्सनी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. एकीकडे वीर दासचा हा चित्रपट तयार आहे, तर दुसरीकडे त्याचा 1984च्या दंगलीवर आधारित चित्रपटदेखील सुरू होणार आहे. यामध्ये सोहा अली खानचा सहभाग असणार आहे.