मुंबईः हैदराबादमध्ये झालेला भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना अनेक कारणांसाठी खास ठरला. एकीकडे विजय प्राप्त करून भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खिशात घातली. तर दुसरीकडे हैदराबादच्या स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत कर्णधार विराट कोहलीने प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची दिलेली 'फ्लाईंग किस' आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
या मॅचला अनुष्का शर्माची विशेष उपस्थिती होती. विराटच्या अर्धशतकी खेळीतल्या प्रत्येक फटकेबाजीला अनुष्का टाळ्या वाजवून दाद देताना दिसली. यावेळी विराटनेही
आपले अर्धशतकाच्या उत्साहात अनुष्काला फ्लाईंग किसची भेट दिली. यावेळी मैदानाच हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. मात्र त्याने कुणाचीही पर्वा न करता अनुष्काला 'Kiss Of Love'ची भेट दिली.
खरं तर या दोघांनीही आतापर्यंत उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र अनेक ठिकाणी ही जोडी एकत्र फिरताना दिसली आहे. आता विराटने अनुष्काला फ्लाईंग किस देऊन अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी पुढील स्लाईड शोवर क्लिक करा...