आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: ऐश्वर्याचा दीवाना होता विवेक, कर्नाटकच्या माजी मंत्रीच्या मुलीशी थाटला संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वाच्या लग्नाचे छायाचित्र)
मुंबई: रामगोपाल वर्माच्या 'कंपनी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारा अभिनेता विवेक ओबेरॉय आज त्याचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये विवेकने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यामध्ये 'साथिया', 'मस्ती', 'ओमकारा', 'रक्त चरित्र', 'क्रिश 3', 'ग्रँड मस्ती'सारख्या सिनेमे सामील आहेत. विवेक एक चांगला अभिनेता आहे हे त्याने पहिल्या सिनेमात सिध्द केले होते. 'कंपनी'साठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट पदापर्ण (अभिनेता) हा पुरस्कार मिळाला होता.
विवेकचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी बॉलिवूड अभिनेता सुरेश ओबेरॉयच्या घरी झाला होता. त्याची आईचे नाव यशोधरा आहे. विवेकने अजमेरच्या मेयो शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर मुंबईच्या जुहू परिसरातील मीठीबाई कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. पुढील शिक्षणसाठी विवेक न्यूयॉर्कला गेला. तिथे त्याने अभिनयाचे धडे घेतले. भारतात येऊन त्याने पटकथा लेखणाचे काम केले. 2002मध्ये 'कंपनी' सिनेमात अजय देवगणसह अभिनय करण्याची संधी त्याच्याकडे चालून आली. बॉलिवूडसह विवेकने हॉलिवूड सिनेमांना आवाज दिला आहे.
अफेअर आणि लग्न
एकेकाळी विवेकचे नाव ऐश्वर्या राय बच्चनसह जोडले गेले होते. मात्र, ऐश्वर्या विवेकला एक चांगला मित्र मानत होती आणि विवेक तिच्यावर प्रेम करत होता. ऐश्वर्याने विवेकला बालीश म्हणून त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2010 रोजी कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी प्रियांका अल्वासह तो लग्नगाठीत अडकला. त्यांचे लग्न बंगळुरू येथे झाले आणि रिसेप्शन मुंबईमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या लग्नात बॉलिवूडपासून राजकिय नेत्यांपर्यंत सर्वच दिग्गज उपस्थित होते. दोघांना विवान वीर हा एक मुलगादेखील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विवेक-प्रियांकाच्या लग्नाचा अल्बम...