आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकची वेगळी वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे बॉलीवूड कलावंत, सिनेमा निर्माते किंवा दिग्दर्शक बनण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे विवेक ओबेरॉयने वेगळ्या क्षेत्राची निवड केली आहे. तो पटकथा लिहिण्याची तयारी करत आहे. विवेकने करिअरमध्ये अचानक यू-टर्न घेण्यामागे त्याची सासू नंदिनी अल्वा यांचा हात आहे. नंदिनी यांनी सांगितले की, ‘विवेकची लेखनशैली चांगली आहे. त्याचे वाचनदेखील भरपूर असून बर्‍याच गोष्टी त्याच्या स्मरणात राहतात. त्यामुळे मी त्याला लिखाण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.’
स्वत:च्या या नवीन वाटचालीबद्दल विवकदेखील आनंदी आहे. तो म्हणतो, ‘माझ्या सासूने मला लिखाण करण्यास प्रोत्साहित केले. यामुळे मला आता लिखाण करण्यास बळ मिळत आहे. सध्या मी अनेक सिनेमे लेखकांच्या संपर्कात आहे. माझ्याजवळ अनेक नावीन्यपूर्ण कल्पना असून त्या लवकरच कागदावर उतरवणार आहे. जर कोणाला माझ्या कथा ऐकायच्या असतील तर मी त्यांना जरूर ऐकवील, पण त्याला वेळ आहे.’