आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा: शाहरुखने रिलीजपूर्वीच पाहिले होते \'PK\'चे विवस्त्र पोस्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: शाहरुख खान)

मुंबई:
बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानचा दावा आहे, की त्याने आमिर खानच्या 'पीके'चे विवस्त्र पोस्टर रिलीज होण्यापूर्वीच बघितले होते. एका प्रसिध्द मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला आहे. शाहरुख आणि आमिर यांच्यात मतभेत असल्याचे मीडीयाला वाटते मात्र असे काही नाहीये. कारण शाहरुख आणि आमिर सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. दोघांचा जवळचा मित्र राजकुमार हिराणी यांनी 'पीके'चे पोस्टर रिलीज होण्यापूर्वी सर्वात पहिले शाहरुखला दाखवले होते.
रिलीजनंतर पोस्टर वादात अडकल्यावर आमिरने स्पष्ट सांगितले होते, की हे पोस्टर केवळ पब्लिसिटीसाठी तयार करण्यात आलेले नाहीये. विवस्त्र पोस्टर रिलिज करण्यामागे कारण आहे. तसेच, शाहरुखलासुध्दा ठाऊक आहे, की आमिर 'पीके'च्या पोस्टरवर विवस्त्र का झाला आहे.
ही बातमी शाहरुख आणि आमिर यांच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करते. मात्र जेव्हापासून 'पीके'चे पोस्टर रिलीज झाले आहे, शाहरुख आमिरची खिल्ली उडवताना दिसला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पोस्टरवर आमिर विवस्त्र होण्यावर काय म्हणाला होता शाहरुख आणि वादाने तंग झालेला आमिर काय म्हणाला...